अश्विनी कुलकर्णी - लेख सूची

‘मनरेगा’च्या कंत्राटीकरणाचा धोका!

एखाद्या मध्यम शहरात विमानतळाची गरज आहे, येथील लोकांना – खास करून व्यावसायिकांना विमान सेवेची गरज आहे. कारण त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हे विधान निर्विवादपणे सत्य आहे असे मानले जाते. असे मानताना इथे विमान सेवा सुरू करण्यासाठी शासनाला नेमका खर्च किती येईल, त्याचा परतावा कसा व केव्हा मिळू शकतो, याची आपण चर्चा करीत नाही. उड्डाणपूल, …

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

पी साईनाथ यांच्या वार्तांकनातुन ग्रामीण, दुर्लक्षीत, पिडीत समाजाची परिस्थीती मुख्य इंग्रजी दैनिकातुन दिसु लागली. हाच वारसा सांगणारे, इंग्रजीतुन वार्तांकन करणारे जयदीप हर्डीकर यांनी A Village Awaits Doomsday(Penguin Books) हे पुस्तक लिहीले आहे.

अध्यादेश निघाला-आता अंमलबजावणी

करणी, भानामती, जरण-मरण, मंत्र-जंत्र, सैतान, भुताळी, चेटुक, गंडा-दोरा असे शब्द वापरत नवीन वटहुकुम महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, २०१३ या नावाने २६ ऑगस्ट रोजी निघाला. भोंदूबाबा प्रकरण : पोलिसांचा पुढाकार, अंनिसकडून स्वागत. जादूटोणाविरोधी अध्यादेशाचा पहिला गुन्हा दाखल. (लोकमत ५ सप्टेंबर …

संपादकीय सक्षम नागरिकतेसाठी

भारतीय संविधानाचे हे साठावे वर्ष. या संविधानाने आपल्या देशाच्या प्रगतीच्या आणि उन्नतीच्या भव्य स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठीचा अवकाश प्राप्त करून दिला. कायदा व सुव्यवस्था यांपलिकडची जबाबदारी राज्यकर्त्यांना दिली. म्हणूनच सामाजिक सुरक्षा, सामाजिक न्याय मिळवून देणारे कायदे आपल्या संसदेने आपल्याला दिले. वंचित घटकांकडे विशेष लक्ष देण्यासाठीही अनेक तरतुदी केल्या गेल्या. या संकल्पनांना धोरणात्मक स्वरूप देऊन त्यातून …

आम्ही या देशाचे नागरिक ….

आम्ही भारताचे नागरिक… हे शब्द साठाव्या वर्षी खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीय अनुभवू शकतो आहे तो माहिती अधिकार कायद्यामुळे. विकासाच्या आड येणाऱ्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी सरकारी माहिती लोकांसाठी खुली व्हावी, इथपासून सुरू झालेली माहिती अधिकाराची चळवळ सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. सामान्य भारतीयाला असामान्य अधिकार देणाऱ्या या कायद्याचा जन्मच लोकचळवळीतून झाला. सरकारी पातळीवरील नकारात्मक मानसिकतेला …